द्रोणागिरीवर तोफगाडा दुर्गार्पण

| उरण । वार्ताहर ।

उरणमधील द्रोणागिरी किल्ल्याला ब्रिटीश व पोर्तुगीज पासूनचा इतिहास आहे. अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचे महत्व होते. या किल्ल्यावर अनेक वर्षांपूर्वी काही तोफा असल्याच्या नोंदी आहेत. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या किल्ल्यावर असलेल्या तोफा गहाळ झाल्या. त्या सर्व तोफांपैकी एक तोफ दुर्गसंवर्धनामध्ये काम करणार्‍या सर्व संस्थांनी मिळून शोधून ती गडावर नेण्यात आली. या तोफेचे वैभव परत मिळविण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान उरणच्यावतीने लोखंडी तोफगाडा बसविण्यात आला. माजी आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते तोफगाड्याचे दुर्गार्पण केले. या प्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे, संदेश ठाकूर, संतोष पवार, वैभव घरत, सुखद राणे, भास्कर मोकल, शुभांगी पाटील, भरत देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version