| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी मातेच्या मंदिराची संरक्षण भिंतीचे भूमिपूजन शेकाप महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत यांच्या हस्ते करण्यात आले. माजी सभापती अॅड. सागर कडू यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन फंडातून दहा लाखाचं निधी या कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवी बुरुंडे यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, वंदना कोळी,नागाव ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र ठाकूर, मंदिर कमिटी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भुमीपूजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.