। नेरळ । प्रतिनिधी ।
कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले.
या माहिती केंद्रात विद्यापीठ निर्मित विविध भात वाण नमुने, कृषी औजारे, भाताच्या विविध लागवड पद्धतींची छायाचित्रांसह अभ्यासपूर्ण माहिती यांचा समावेश या माहिती केंद्रामध्ये करण्यात आला आहे. याठिकाणी शेतकर्यांना आणि शेतीविषयक जिज्ञासा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इत्यंभूत माहिती मिळणार आहे. प्रत्येकाला क्षणार्धात विविध अॅप्स डाऊनलोड करता येतील. त्यामुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे. ज्ञान, क्रयशक्ती व राहणीमान उंचावण्यासाठी उपयोग होणार असल्याने शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजय भावे यांनी केले आहे.