। चिरनेर । प्रतिनिधी ।
चिरनेर येथील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने चिरनेर येथील मातोश्री मैदानावर यंदा प्रथमच मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेतेपद पटकाविणार्या क्रिकेट संघाला प्रीतमदादा चषक 2025 च्या चषकाने गौरविण्यात येणार आहे. शनिवारी (दि.8) व रविवारी (दि.9) या दोन दिवसात हे सामने खेळविले जाणार आहेत. सदर नियोजित सामन्यांचे उद्घाटन शेकापक्षाचे नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, उरण तालुका शेकाप सहचिटणीस सुरेश पाटील, उरणचे माजी सभापती नरेशशेठ घरत, शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पं. स.माजी सदस्य रमाकांत पाटील, सरपंच भास्कर मोकल, कामगार नेते रवी घरत, उरण पं. स. माजी उपसभापती शुभांगीताई पाटील, शेकाप युवा नेते दीपक मढवी, शेकाप युवा नेते निलेश म्हात्रे, चिरनेर ग्रा.प. सदस्य प्रफुल्ल खारपाटील, नवनिर्वाचित उपसरपंच अरुण पाटील, काँग्रेस आय युवा नेते अलंकार परदेशी, शेकाप युवा नेते रोशन डाकी, जासईचे सरपंच संतोष घरत, उरण भाजपा खजिनदार सुशांत पाटील, चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील, समाधान ठाकूर, सचिन घबाडी, निकिता नारंगीकर, नीलम चौलकर, समीर डुंगीकर, जयश्री चिर्लेकर, मृणाली ठाकूर, समुद्रा म्हात्रे, भारती ठाकूर, यशोदा कातकरी, वनिता गोंधळी तसेच विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर व शेकापचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.