नावंढेत रुग्णवाहिकेचा लोकार्पण

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील नावंढे ग्रामपंचायतीतील नागरिकांसाठी रुग्ण सेवेसाठी सर्व सोयीयुक्त जीवनदान रुग्ण वाहिका तात्काळ सेवा देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.मुंबई-पुणे-सोलापूर पाईपलाईन कंपनीने सीआरएस फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून त्या रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा 25 एप्रिल रोजी नावंढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर संपन्न झाला.

याप्रसंगी गिरिश राऊत, विवेककुमार दिनकर, सुनील पिंगळे, अक्षय पिंगळे, उषा पिंगळे, श्रीकांत हाडप, संकेत हाडप, प्रकाश पिंगळे, शारदा वाघमारे, संतोष पवार, शेखर हाडप रामदास हाडप, रोहिदास पिंगळे, धनाजी फराट, समीर हाडप, तानाजी पाटील, किरण हाडप, दिपक हाडप, निलेश हाडप, हळूराम पिंगळे, चंद्रकांत पिंगळे देविदास तवले, हेमंत हाडप, बाळाराम हाडप, काशिनाथ हाडप, शरद हाडप, प्रशांत पिंगळे, राकेश पिंगळे, कैलास पिंगळे, अंजली पाटील, संजीवनी पिंगळे, शारदा हाडप आदीप्रमुखासह ग्रामस्थ वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version