नावांढे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
। खोपोली । प्रतिनिधी ।
इंग्रजी, सीबीएसई, आयसीसई शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकणे आणि टिकवणे अवघड होत गेले आहे. अनेक मराठी शाळा बंदही पडत आहेत. मराठी शाळा टिकविण्यासाठी जे पालक आपल्या मुलांचा जि.प.शाळेत प्रवेश घेतील, अशा पालकांची घरपट्टी माफ केली जाणार आहे. तसेच, वृक्षलागवड आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गावातील ज्या महिला पाच झाडे लावून संगोपन करतील, अशा महिलांना पैठणी साडी आणि पुरूषांना पोशाख देऊन सन्मान करण्यात येणार आहे. असा ऐतिहासिक निर्णय नावंढे ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखाने घेतला आहे. असा निर्णय घेणारी नावंढे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यावेळी ग्रामसेवक पाटोळे, किरण हाडप, शेखर हाडप, पप्पू हाडप, ज्योती पिंगळे यांच्यासह नावंढे घोडीवली, कांढरोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.