| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील वाणदे येथील स्मशानभूमीकडे जाणार्या काँक्रिट रस्त्याचे उद्घाटन शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित पाटील म्हणाले की, आम्ही शेकापचे कार्यकर्ते दिलेले वचन पूर्ण करतो. करता येईल तेच बोलतो आणि वचन पूर्ण करतो. वाणदे गावचे लोक कायम शेकापबरोबर आहेत. त्यामुळे त्यांची विकासकामे पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांनी यापुढेदेखील आमच्याबरोबर राहून विकास साधावा, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले. शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील म्हणाले की, पंडित पाटील आणि पाटील परिवाराचा आमच्या गावावर आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. म्हणूनच गावातील लाखो रुपयांची लोकोपयोगी कामे वेगाने होत आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, तुकाराम पाटील, राजेश दिवेकर, अजित कासार, अमोल पाटील, स्वाती वारगे, श्रीकांत वारगे, धर्मा हिरवे, रमेश दिवेकर, अशोक नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.