श्रावणी स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल श्रावणी स्पोर्ट्स आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा रेवदंडा हरेश्व‍र मैदानात मोठया उत्साहात शुभारंभ संपन्न झाला. चौल श्रावणी स्पोर्ट्स वतीने मर्यादीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि.20,21,22 जानेवारी रोजी रेवदंडा हरेश्‌‍‍‍वर मैदानात करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ कार्यक्रम शनिवार दि.20 रोजी दुपारी साडेअकराचे सुमारास संपन्न झाला. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, उपसरपंच अजीत गुरव, अजीत मिसाळ, निलेश नाईक व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी प्रशांत मिसाळ यांनी गोलदांजी व सुरेंद्र म्हात्रे यांनी फलदांजी करून स्पर्धा शुभारंभाचा आनंद लुटला. चौल श्रावणी स्पोर्ट्स वतीने उपस्थित मान्यवराचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 30 हजार रूपये रोख व चषक, व्दितीय क्रमांकास 15 हजार रूपये रोख व चषक, तृतीय क्रमांकास 10 हजार रूपये रोख व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज सायकल, उत्कृष्ट फलदांज चषक, उत्कृष्ट गोलदांज चषक आदी बक्षिसे वितरीत करण्यात येत आहेत.

Exit mobile version