। सुतारवाडी । वार्ताहर ।
ज्ञान प्रदाय शिक्षण संस्था आंबेवाडी कोलाड यांच्या माध्यमातून शिरीष अनप्लग संगीत अकॅडमी पुरस्कृत स्थानिक मुलांसाठी डान्स अकॅडमी सुरु करुन दालन उपलब्ध करून देण्याचे काम शिरीष शिवराम महाबळे व रॉनि पठार यांनी केले आहे. या डान्स अकॅडमीचे उद्घाटन कुणबी युवक तथा कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रो.डॉ. सागर सानप (बी.एन.एन. कॉलेज भिवंडी) तसेच ज्ञान प्रदाय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवरामजी महाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या डान्स अकॅडमी सुरु करण्यात आली असल्याचे मत संस्थेचे संस्थापक शिवरामजी महाबळे यांनी व्यक्त केले. अधिक माहिती साठी8446590930/7028590930/9923759711 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.