। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 3 मध्ये कृषीदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरपरिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, मुख्याध्यापिका कल्पना पेणकर, महेंद्र हावरे, समाजसेवक संतोष दांडेकर, सीमा दांडेकर, उद्धव दांडेकर व विद्यार्थी उपस्थिती होते. प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर व शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सामाजिक वनीकरण विभागाकडून महेंद्र हावरे यांनी वावडुंगी या नर्सरीतील आणलेली बहावा, बांबू, सीताफळ ही रोपे लावली. यावेळी दिवेकर यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेशही देण्यात आला. शेवटी श्री. हावरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.