आ.बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनी विकास कामांची उद्घाटने

। पनवेल । वार्ताहर ।
जन्मदिनाच्या निमित्ताने आपण समाजाचे ऋण फेडले पाहिजे, गरजवंताला मदत केली पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची पहिल्यापासून उदात्त भूमिका राहिली आहे. त्यामुळे वाढदिवसाचे भडक किंवा भपकेबाज प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमांच्या द्वारे वाढदिवस नेहेमीच साजरे केले जातात. त्याचीच प्रचिती शनिवार दिनांक 25 डिसेंबर रोजी आली. आ. बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विकासकामांची उद्घाटने करण्यात आली.

आ. पाटील यांच्या हस्ते सर्व उद्घाटन संपन्न झाली. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी,सदस्य विलास फडके, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे सभापती डॉ. दत्तात्रेय पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या वृषाली देशेकर,सुभाष भोपी, भिंगार ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्‍वर ठाकूर, माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर पाटील, माजी चिटणीस जगन्नाथ पवार, दीपक पाटील, संदीप घोगरे, प्रकाश पाटील, बंधू मोरे, सुरेश वाघमारे, आदिनाथ गायकर, भरत पाटील, विमल पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, विशाल पाटील, हिरामण खेत्री, वसंता गायकर, राजेंद्र गायकर, पांडुरंग पाटील शांताराम पवार आदी मान्यवर यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदी मान्यवरांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version