| महाड | प्रतिनिधी |
कोकण पट्ट्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेला भक्कम व दर्घकालीन बळ देणारा ऐतिहासिक उपक्रम महाड येथे साकार झाला. ओलॉन इंडिया प्रा. लि. महाड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत महाड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक व जीवनावश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि.14) पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि स्टॅटेजिक प्लॅनिंग ऑण्ड सप्लाय चेनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट ख्रिस्तियानो कॅप्रिऑत्ती यांच्या हस्ते या वैद्यकीय साधनसामुग्रीचे लोकार्पण करण्यात आले. महाड ग्रामीण रुग्णालय मंबई- गोवा महामार्गालगत असल्यामुळे येथे रस्ते अपघात, सर्पदंश, विंचूदंश, गरोदर माता तसेच अन्य गंभीर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचाराकरिता दाखल होत असतात. परंतु, आधुनिक उपकरणांच्या अभावामुळे यापूर्वी अनेक गंभीर रुग्णांना पुढील उपचाराकरिता अलिबाग किंवा मंबई येथे हलवावे लागत होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन ओलॉन इंडियाने सामाजिक जबाबदारीची ठोस व सजग भूमिका घेत हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन
