यंत्रमाग कपड्याचे प्रदर्शन-विक्री केंद्राचे उद्घाटन

| अलिबाग | वार्ताहर |

भाऊराया हॅण्डलूम सोलापूर यांचे हातमाग व यंत्रमाग कपड्याचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल मुख्य पोस्ट ऑफिस समोर समाज कल्याण विभाग अधिकारी साईनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 01 ते 15 मे पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शन प्रसंगी पांडुरंग पोतन, बाळू कोडम, गोवर्धन कोडम, दीपक गुंडू, पुरुषोत्तम पोतन, लक्ष्मण उडता, श्रीकांत श्रीराम, उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची कॉटन साडी, इरकली साडी, मधुराई साडी, पटोला साडी, सेमी पैठणी, खाली कॉटन, खाली सिल्क, पटोला ड्रेस, मटेरियल ड्रेस मटेरियल टॉप, पीस खान साडी, सोलापूर सुप्रसिद्ध चादर, डबल बेडशीट, रजाई पंचा टॉवेल, सतरंजी लुंगी, पिलोकावर बंडी, पायजमा, कुर्ता, लेडीज गाऊन, लेडीज अँड बॅग वॉल हैंगिंग असे विविध प्रकारचे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत सूचित व खादी कापडाचे विक्रीवर 20 टक्के सूट ठेवण्यात आली आहे .

Exit mobile version