| सांगोला | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा रविवार (दि.13) सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याच कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख,पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकाप नेते आ.जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आमदार बबनराव शिंदे. सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, अनिल बाबर, संजय शिंदे, समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नरसय्या आडम, राजेंद्र देशमुख, दिलीप माने, वैभव नायकवडी, शिवाजीराव काळूंगे, बाबुराव गुरव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्मारकाचे वजन 600 किलो असून ते संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवले आहे. स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर (मिरज) यांनी केली आहे.