कुसुंबळे । वार्ताहर ।
अंगणवाडी ज्ञानवाडीच्या नविन इमारतीचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद सदस्या, महिला बालकल्याण कमिटी सदस्या तसेच झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. त्यानंतर पोषण महा प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रा पाटील याच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी सेविका प्रज्ञा समीर म्हात्रे हिचा निबंध स्पर्धेत रायगड जिल्ह्यामधून उत्तेजनार्थ क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शनात चित्रा पाटील यांनी उपस्थित गरोदर स्तनदा महिलांना तसेच पालक व किशोरी मातांना व मुलींना मार्गदर्शन करताना आरोग्याच्या दृष्टीने भाज्या, फळे, रानभाज्या, सुका मेवा तसेच इतर आहारांबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी मध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी येणार्या टीएचआर बद्दल पालकांना जाणीवजागृती करणे गरजेचे आहे तसेच हा आहार मुलांसाठी कशा पद्धतीने शिजवला पाहिजे व त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करून तो मुलांना खाऊ घातला पाहिजे याची माहिती दिली. ज्ञानवाडी ही अंगणवाडी डिजिटल झाल्याबद्दल अंगणवाडी सेविका निशा कदम,मदतनीस नंदा नाईक हीचे विशेष कौतुक केले. तसेच अंगणवाडीची उत्तम सजावट केल्याबद्दल अंगणवाडी सेविका स्नेहा घाडगे, सुकेशिनी दांडेकर, प्रगती थळे, मानिनी कदम, सुगंधा कदम, श्वेता केळकर, जिविता पाटील, निशा कदम, नंदा नाईक यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे पाटील, संपदा म्हात्रे, सरपंच वाघोडे कृष्णा केशव जाधव, सुरेखा नाईक,जगदीश पाटील, वाघोडे ग्रामपंचायत सदस्य सुमित माने,निलेश गावंड,भाग्यश्री पाटील, कल्पिता साळावकर, दीप्ती मोकल,अपेक्षा म्हात्रे, राजिप.प्रा. शाळा ज्ञानवाडीच्या प्रतिभा भगत,सरोज मोरे, वाघोडे ग्राम पंचायतीच्या सरिता जाधव, उज्ज्वला नाईक, वसुधा पाटील, चिखली प्रा. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, उपकेंद्र वाघोडे आरोग्य सेवक – सेविका, वाघोडे ग्रुप ग्रामपंचायत सर्व सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ इ. मान्यवर मंडळीची उपस्थिती प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांनी केले
तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी केले.