जेएस व्हिजन अलिबाग यू ट्यूब चॅनलचे उद्घाटन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग येथील अनुज जितेंद्र शिगवण या तरुणाने जेएस व्हिजन अलिबाग (JS Vision-Alibag) या नावाने कार्यक्रमांच्या यू ट्यूब वरील लाईव्ह प्रक्षेपण व्यवसायात पदार्पण केले आहे.

त्यांचे औपचारिक उद्घाटन अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदिप नाईक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे सदस्य प्रकाश पावसकर, अ‍ॅड. महेश मोहिते, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अलिबाग प्रेस असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र शिगवण, रायगड फोटोग्राफर अ‍ॅन्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, अलिबाग प्रेस असोसिएशन चे माजी अध्यक्ष रमेश कांबळे आदी मान्यवर होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अनुज शिगवण यांचे कौतुक करत तरुणांनी बदलत्या काळानुसार व्यावसायिक बदल घडवण्याची अपेक्षा व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version