कबड्डी स्पर्धेने क्रीडाशौकीन सुखावले
प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, अपेक्षा कारेकर यांच्या हस्ते उद्घाटन
| अलिबाग | अमोल नाईक |
युवा शेकाप आणि बी यू प्रोडक्शन आयोजित क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अपेक्षा कारेकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अजय झुंझारराव, अनिल चोपडा यांच्यासह विक्रांत वार्डे, महिला आघाडीच्या सदस्या, आयोजक उमेश कोळी, अॅड. भूमिका इतर मान्यवर, क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.