मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे पनवेल येथे उद्घाटन

डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल

| रायगड | प्रतिनिधी |

आरोग्य व्यवस्थेचे डिजिटलायझेशन केल्याने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येणार आहेत. रायगड जिल्ह्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून सर्व सुविधा तळागाळापर्यंत पोहचावायच्या आहेत तेव्हाच रायगड हे मॉडेल जिल्हा बनेल. यासाठी आपण रोडमॅप बनवून त्यानुसार काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीइओ डॉ. सुनीलकुमार बर्नवाल यांनी केले.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्याची मॉडेल जिल्हा म्हणून निवड करण्यात आली असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी सुरुवातीसाठी आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात रायगड मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची उद्दिष्टे, डिजिटल आरोग्य नोंदींची अंमलबजावणी, आभा आयडी निर्मिती, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री आणि हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री यांसारख्या तांत्रिक व महत्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. रायगड जिल्ह्याची मॉडेल जिल्हा म्हणून झालेली ही निवड महाराष्ट्राच्या डिजिटल आरोग्य क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या उपक्रमातून समोर येणाऱ्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुभव भविष्यात राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी दीपस्तंभाचे काम करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक डॉ. पंकजकुमार अरोरा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रविन्द्रन, अतिरीक्त अभियान संचालक जगन्नाथ वीरकर, सहसंचालक डॉ.सुनीता गेहोलोत, उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती नेहुलकर, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, पनवेल मनपा मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सध्याचा जमाना हा जेन झीचा जमाना आहे. त्यामुळे डिजीटलायझेन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. ज्या खासगी आरोग्य संस्थां -इऊच्‌‍-संलग्न कचखड सुरू करून -इऊच्‌‍ मध्ये व्यापक सहभाग सुनिश्चित करतील तेच ऑनलाईन सेवामध्ये दिसतील. अशा माध्यमातून सुविधांचे डिजीटलायलेझन केल्यास रूग्ण खबरदारी घेतील व लोक आजारी पडणार नाही, यामाध्यमातून आपण प्रतिबंधात्मक आरोग्याकडे वाटचाल करतील.

बर्नवाल

Exit mobile version