| पनवेल | वार्ताहर |
खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
यावेळी आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप विशेष योजनेतंर्गत मदतही करण्यात आली. तसेच तळोजा येथील फेज-1 व फेज-2 येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. पनवेल शहर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर आणि नर्स या कोरोना योध्दांचा सत्कार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना या योजनेंतर्गत चार हजार रुपये प्रती कुटुंब अनुदान देण्यात आले. यामध्ये 2000 रुपयांच्या वस्तू स्वरुपात वाटप आणि 2000 इतकी रक्कम बँक / डाक खात्यामध्ये वितरीत करण्यात मान्यता देण्यात आली. उरण तालुक्यातील 922 तर पनवेल तालुक्यातील 5 हजार 368 नागरिक या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. यावेळी पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडेकर, नायब तहसीलदार मांडे, राष्ट्रवादीचे सरचटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल अध्यक्ष सतिश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास काबंळे, सामाजिक न्याय विभागाचे किशोर देवधेकर आदी उपस्थित होते.