आवास ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तुचे लोकार्पण

| खारेपाट | वार्ताहर |
आवास ग्रामपंचायतीच्या सुसज्य नुतन वास्तुचे लोकार्पण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आ.प्रकाश बिनसाळे, श्रध्दा भगत, माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, डॉ. रोहित बर्मन तसेच सरपंच अभिजित राणे, राणे डॉ. अनिरुध्द कोहली, ग्रामसेवक एन. टी म्हात्रे, उपसरपंच पूजा राणे, सदस्य सुधिर राऊळ, सुधाकर राणे, राजेंद्र वाकडे, सुहासिनी राणे, प्रगती थळे, श्‍वेता वाकडे, ज्योती पवार, सोनाली माने, निधी भगत आदि सदस्य उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विविध स्थरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. नुतन वास्तुच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी मान्यवरांच्या हास्ते उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य तसेच पोलिस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version