| पेण | प्रतिनिधी |
पेणचे प्रसिध्द उद्योजक राजू पिचिका यांच्या सावरसई येथील रामेश्वर सीएनजी पंपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विशालाक्षी सत्यनारायण पिचिका, प्रकाश झावरे, शंकर पडवळ, माजी गटशिक्षण अधिकारी पी.डी. पाटील, राजु पाटील, शैलेश शिंगरूत, दयानंद भगत, निळकंठ म्हात्रे, पीडब्ल्यूडीचे अभियंता डी.एम. म्हात्रे, युवा नेते मंगेश दळवी, जेष्ठ पत्रकार विजय मोकल, संतोष पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पेण-खोपोली मार्गावरील सावरसई गावानजीक हा सीएनजी पंप सुरू करण्यात आला आहे. सदर पंप सुरू झाल्याने पेण तालुका व आजूबाजूच्या तालुक्यातील वाहन चालकांसह रायगड, खालापुर, खोपोली, पुणे व इतर जिल्हयातील वाहनचालक यांना सोयीचे झाले असल्याची प्रकाश झावरे यांनी सांगितले. तसेच तीन आसनी रिक्षा, मिनी डोअर, मॅजीक या गाडयांसाठी स्वतंत्र लाईनीची सुविधा करून दिली असल्याची देखील यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक वाहनांसाठी वेगळी सुविधा असल्याने वेळेची बचत होणार आहे.