| कोर्लई | वार्ताहर |
118व्या रोटरी स्थापना दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर तर्फे अलिबाग येथे रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या कार्यालयाचा शुभारंभ सोहळा रो. डिस्ट्रिक 3131 चे डिस्ट्रिक डायरेक्टर रो. पंकज पटेल यांच्या अध्यक्षतेखाली रो. विनी पंकज पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात रो. क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे अध्यक्ष रो. निमिष परब आणि रो. अँन्स निधी निमिष परब यांच्या हस्ते गणेश पूजनाने करण्यात आली. रो. डॉ. गणपत पाटील यांच्या रो. अँन्स डॉ. सुवर्णा ग. पाटील यांच्या हस्ते फीत कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. समाजकार्याच्या प्रति आदर ह्या एकमेव हेतूने रो. डॉ. गणपत पाटील तसेच डॉ. सुवर्णा ग. पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलची एक रूम रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली आहे.
रो. सौरभ आपटे रा. नागाव यांनी रो. पंकज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम या उपक्रमा अंतर्गत त्यांच्या राहत्या शाळा न्यू विद्या मंदिर नागाव या शाळेला विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ई लर्निंग किट सुपूर्द करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाला क्लबचे सचिव रो. कुमार जोगळेकर, खजिनदार रो. डॉ. निलेश म्हात्रे, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.