शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे लोकार्पण

| राबगाव/पाली | वार्ताहर |

तालुक्यातील राबगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ ठाणे, पुणे, मुंबई आदिसह महिला वर्गाच्या विशेष उपस्थितीत रविवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह शिवज्योत घेऊन गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मिरवणुकीचे गावातील नागरिकांनी घरोघरी औक्षण करून स्वागत केले. यावेळी गावातील तरुणीने लाटीकाटी तलवारबाजीसह शिवकालीन प्रात्यक्षिके करून गावातील ग्रामस्थांची मने जिंकली. संपूर्ण गावातून ही भव्य मिरवणूक फिरून आल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशा स्वरूपात बनविण्यात आलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण भक्तीमय वातावरणात करण्यात आले.

Exit mobile version