| मुंबई | वृत्तसंस्था |
देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर म्हणजेच शिवडी ते न्हावाशेवा सी लिंकचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.12 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. याचसोबत खारकोपर-उरण रेल्वेचे आणि नवी मुंबईतील बेलापूर-पेंधर या मेट्रोचेही उद्घाटन केले जाणार आहे.
तिसऱ्या महामुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत (एमएमआरडीए) निर्माण केला जाणारा एमटीएचएल हा शिवडी-न्हावा चिर्ले 21.8 किलोमीटर लांबीचा सर्वात लांब सागरी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सागरी सेतूची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे ‘या’ दिवशी उद्घाटन
