पंडित पाटील यांच्या हस्ते नळपाणी दुरुस्तीचे उद्घाटन

| रोहा | वार्ताहर |

आई जाखमाता देवीचा भंडारा व नळपाणी दुरुस्तीचे उद्घाटन शेकाप नेते आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहा तालुका चिटणीस राजाभाऊ सानप, राजिप माजी सदस्य नंदू म्हात्रे, पं.स. माजी सभापती लक्ष्मण महाले, सरपंच नारायण गायकर, उपसरपंच संकेत जोशी, काशिनाथ भोईर, ग्रा.पं. सदस्या सुचिता शिंदे, सदस्या नीलम वारगे, सदस्या दर्शना गायकर, यशंवत शिंदे, अनिल मोरे, मनोहर वारगे, चंद्रकांत कांबळे, हिराजी कांडणेकर, माजी सरपंच पूनम गोविलकर, रमेश सातामकर, प्रतिक कांडणेकर व शेकापचे असंख्ये कार्यकर्ते व महिला मंडळातील सदस्या उपस्थित होत्या.

Exit mobile version