छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण

| नागोठणे | वार्ताहर |

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे निर्माण करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना सोमवार दि. 22 रोजी होत असून यासाठी संपूर्ण देशात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभू श्री रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून नागोठणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा ऐतिहासिक नागोठणे नगरीत सोमवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास विभागातील शिवप्रेमी नागरिकांनी व ग्रमस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी केले आहे.

सोमवार दि. 22 रोजी श्रीरामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी 8 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना सकाळी 11 वा. किशोर जैन यांच्या हस्ते नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक, डॉ. मिलिंद धात्रक, अखलाख पानसरे आणि सर्व सदस्य तसेच नागोठणेकरांच्या उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Exit mobile version