चौक येथील नामफलकाचे उद्घाटन

| चौक | वार्ताहार |

खालापूर तालुक्यातील चौक गाव हे सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असून चौक गावात त्यांच्या नावे सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर, नेताजी भात गिरणी, नेताजी पथ, नेताजी पालकर नाट्यकला इत्यादी संघटना कार्यरत आहेत. चौकातील वर्षानुवर्ष व्यापार करणारे व्यापारी वर्ग शिवजयंतीच्या शुभदिनी आपल्या व्यापाऱ्याला व सर्व सदस्यांना एकत्रित काम करण्यासाठी एकत्र येता यावे, गावात असलेली संघटना नाव रूपाला यावी, यासाठी संघटनेचे नाव सरनोबत नेताजी पालकर व्यापारी संघटना असे केले. चौक गावचे सरपंच रितू सुधीर ठोंबरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटना सल्लागार सुधीर ठोंबरे, संघटनेचे अध्यक्ष हर्षल हनुमंत, उपाध्यक्ष सचिन साखरे, सचिव- निमिष दबके, खजिनदार- महेश चौधरी, व्यापारी संघटनेचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक व ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version