| अलिबाग | प्रतिनिधी |
सन 1972 मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक ही देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. सात राज्यांमध्ये 170 हून अधिक शाखांच्या माध्यमातून बँक ग्राहकांना विविध सेवा व वित्तिय सेवा पुरवित आहे. ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त आणि शाश्वत विकास यांवर भर देत बँक सातत्याने विस्तार करत आहे. दरम्यान, टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या अलिबाग शाखेचे उद्घाटन मंगळवारी (दि.23) करण्यात आले. या अलिबाग शाखेमुळे परिसरातील व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक आणि व्यापारी वर्गाचा बदलत्या बँकिंग गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतील, असे मत बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी अलिबाग शाखेचे उद्घाटन मुख्य अतिथी रघुजीराजे आंग्रे याांच्या हस्ते झाले. यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, तसेच संचालक मंडळाच्या सदस्या आश्विनी बापट व पौर्णिमा रानडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्या श्रावणी जे.व्ही.एल., बँकेचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर ग्राहक, स्थानिक उद्योजक, व्यावािसयक आणि हितसचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रघुजीराजे आंग्रे याांनी बँकेच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, टीजेएसबी सहकारी बँकेने उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि आर्थिक शिस्त याांच्या बळावर ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. अलिबाग शाखेमुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांना आधुनिक बँकिंग सुविधांचा लाभ मिळेल. तसेच, परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.







