| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील नेरे विभागात दोन नवीन बसथांब्यांचा लोकार्पण सोहळा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते पार पडला.
शिवसेनेचे पनवेल तालुका संघटक दिनेश मांडवकर, उपतालुका प्रमुख दुंदरे ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, नेरा विभाग प्रमुख विद्याधर चोरघे यांच्या पाठपुराव्यातून शांतीवन, नॅचरल होम सोसायटी नेरे या दोन ठिकाणी दोन नवीन बसथांबे बांधण्यात आले. नेरे येथील कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, बाळासाहेब पगारे, कैलास माळी, राकेश भोईर, प्रशांत कदम, प्रणव कारखानीस, सुकेश भोपी, अनिल निंबाळकर, सूरज कर्णूक, सुप्रिया मांडवकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
नेरे विभागात दोन नवीन बसथांब्यांचे लोकार्पण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606