। नवीन पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नेरे व दुन्द्रे विभागातील रिटघर, आदर्श गाव शिवनसई आंबे, व नॅचरल होम सोसायटी नेरे या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी केसरीनाथ पाटील (रायगड जिल्हा सचिव), प्रवीण दळवी (रायगड जिल्हा उपाध्यक्ष), आदिती सोनार (रायगड जिल्हा महिला अध्यक्ष), योगेश चिले (पनवेल महानगर अध्यक्ष), गिरीश तिवारी (रायगड जिल्हा अध्यक्ष सहकार सेना), अतुल चव्हाण (रायगड जिल्हा उपाध्यक्ष), अनिकेत मोहिते (विद्यार्थी सेना पनवेल तालुका अध्यक्ष), सुजित सोनवणे, पराग बालड, दिनेश मांडवकर, विश्वास पुंडलिक पाटील,गुरुनाथ भोपी, विद्याधर चोरघे आदी उपस्थित होते.