पोयनारमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

। खेड । प्रतिनिधी ।
पोयनार ग्रुपग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनिलजी तटकरे यांनी सुचविलेल्या जनसुविधा कार्यक्रमअंतर्गत मंजूर पोयणार बौद्धवाडी रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे आ. संजयराव कदम व जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अजय शेठ बिरवटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी सतु कदम, समाजसेवक चरण मोहीते, माजी सरपंच नारायण मोगरे, पोयनार ग्रामपंचायत सरपंच संदेश मोहीते, उपसरपंच राजेंद्र विचारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाष्टे, ग्रामपंचायत सदस्या अनिषा शिगवण, ग्रामपंचायत सदस्या सृष्टी धुमक, ग्रामपंचायत सदस्य उज्वल धुमक, सुनिल खताते, तंटामुक्ती अध्यक्ष हरीचंद्र झगडे, तानाजी गोरीवले, तुकाराम कास्टे, अजित मोगरे, दिपक मोहिते, वसंत मोहिते, प्रदिप मोहिते, अशोक मोहित तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version