‘प्रासोल’च्या पुढाकारातून सुसज्ज इमारतीचे बांधकाम
। खोपोली । प्रतिनिधी ।
सांजगाव पंचक्रोशीतील मुलांना अल्प खर्चात उत्तम दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी खालापूर तालुका शिक्षण मंडळ सदैव प्रयत्न करीत असून, प्रासोल कंपनी व्यवस्थापकांनी पुढाकार घेत 80 लाख रुपये खर्च करीत भव्य इमारत उभारली आहे. या नव्या इमारतीचे उद्घाटन गुरूवार, दि.23 जून रोजी प्रासोल कंपनीचे डायरेक्टर बी.के. गुप्ता आणि सौ. गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे.
याप्रसंगी खालापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, होनाड ग्रामंपचायत सरपंच अपर्णा देशमुख, आत्करगावच्या सरपंच सीमा तवळे, केटीएसपी मंडळाचे सदस्य दिनेश गुरव, दिलीप पोरवाल, अबू जळगावकर, शिशुमंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी, भास्कर लांडगे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पाटील, माजी सरपंच निकेश देशमुख, ग्रामसेविका स्नेहल घोसाळकर, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, मोरेश्वर देशमुख, विठ्ठल देशमुख, ठेकेदार संदीप पाटील, गुलाब देशमुख, पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्यासह कंपनी व्यस्थापनामधील मनोज काकड, सुधीर पाटील, सचिन प्रभू, सुभाष पाटील, पाटणकर, भट, कुलकर्णी, योगेश पाटील, सुप्रिया मॅडम यांचे अध्यक्ष निरज ओसवाल यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विद्यार्थीनींनी स्वागत गीत गायिले. प्रासोल कंपनीचे डायरेक्टर बी.के. गुप्ता यांना इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा शोधत होतो. ही जागा योग्य असल्याने शाळेच्या इमारतीसाठी मोठी मदत केल्याचे सांगितले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक सुधीर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी देत बी.के. गुप्ता यांनी बांधून दिलेल्या इमारतीला आई विद्या आणि वडील प्रकाश यांचे दिलेले नाव अजरामर राहणार असल्याचे सांगत शाळेचा विस्तार करण्यासाठी ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी कारखान्याच्या माध्यमातून मदत करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खोपोली शहरात शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होते; परंतु गावात शाळा सुरू झाल्यामुळे पालकांची अडचण दूर झाली आहे. त्यामुळेच शाळेसाठी कोणतीही मदत हवी असेल तर ग्रामपंचायत नक्कीच मदत करेल, असे आश्वासन सरपंच अर्पणा देशमुख आणि सदस्य प्रकाश पाटील यांनी दिले. सूत्रसंचालन जितेंद्र देशमुख यांनी, तर आभार मुख्याध्यापिका शीतल मॅडम यांनी मानले.