विठ्ठल रखुमाई मंदिराचे उद्घाटन

| माणगाव | प्रतिनिधी |

दानशूर आप्पा ढवळे यांनी 76 लाख रुपये खर्चून बांधलेल्या तळाशेत येथील विठ्ठल रखुमाई संयुक्त संत नामदेव व दत्त मंदिरासारखे देखणे मंदिर महाराष्ट्रात कुठेही नाही, असे प्रतिपादन माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी तळाशेत येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघ व संत नामदेव शिंपी समाज तळाशेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विठ्ठल रखुमाई संयुक्त संत नामदेव व दत्त मंदिराचा उद्घाटन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार समारंभ रविवार, दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे अध्यक्ष पत्रकार पुरुषोत्तम मुळे हे उपस्थित होते.

या समारंभास सौ. फुटाणे, मेघनाथ सातपुते, मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, द्वारकानाथ ढवळे, अनिल नवगणे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, दत्तात्रेय पांढरकामे, पत्रकार अरुण करंबे, अशोक सातपुते, राजेश मेहता आदींसह ढवळे कुटुंबीय तसेच रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे पदाधिकारी व सदस्य, श्री संत नामदेव शिंपी समाज तळाशेतचे पदाधिकारी व सदस्य,विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हेमंत बारटक्के, तर आभार प्रदर्शन मेघना सातपुते यांनी केले.

Exit mobile version