जाखमाता कड्यावर पाणी योजनेचा शुभारंभ

माजी आ.पंडित पाटील, भावना पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

| दिघी | वृत्तसंस्था |

श्रीवर्धन तालुक्यातील जाखमाता देवी मंदिराचा 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील तसेच भावना पाटील यांच्या हस्ते मंगळवारी या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

बोर्लीपंचतन शहरानजिक असलेल्या जाखमाता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मंदिर हे ऊंच कड्यावर वसलेले आहे. दर्शनासाठी अनेक भाविक पायी जात दर्शन घेतात. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणे गरजेचे होते. एक विहीर व तेथून मंदिरापर्यंत पाईप लाईनसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. त्याप्रमाणे ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली होती. विहीरीसाठी मेंदडी येथील अरशद नाझिर यांच्याकडून जागा देण्यात आली. आमदार जयंत पाटील यांच्या फंडातून वीस लाख रुपयांच्या निधीतून पाणी योजनेचे काम मार्गी लागले आहे.

याप्रसंगी अध्यक्ष राजु पाटील, शिस्ते सरपंच चंद्रकात चाळके, अजित कासार, स्वप्निल बिराडी, रामदास कांबळे, रघुनाथ घाग, चंद्रकांत नाक्ती, संतोष कांबळे, प्रमोद नाक्ति, परशूराम पाटील, अशोक कडू, योगेश धुमाळ, नाना मोहिते, परशूराम बिराडी, गजानन चाळके, बबन घरत, सुधाकर कांबळे, कल्पेश कांबळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version