शेकापमध्ये इन्कमिंग सुरू

देवघरमधील शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा पक्षात प्रवेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील देवघरमधील शेकापचे कार्यकर्ते सुनील घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंदे गटाचे शाखाप्रमुख विशाल वर्तक, रोहिदास वर्तक यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेवर प्रभावित होत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. पं.स.चे माजी सभापती संदीप घरत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गावागावात विकासाची गंगा पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या गावाचा विकास करायचा असेल, तर शेकापशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाल्याने शिंदे गटाचे शाखाप्रमुख विशाल वर्तक, रोहिदास वर्तक यांनी संदीप घरत यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत शेकापमध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमास संदीप घरत यांच्यासह प्रकाश खडपे, राजेंद्र अशोक शिंदे, शैलेश गावंड, राजेश मुंडे, कमलाकर घरत, हरिश्‍चंद्र घरत, राजेंद्र वर्तक, अतिश वर्तक, सुभाष घरत, शशिकांत घरत, अशोक घरत, शांताराम घरत, सुहास चव्हाण, समीर घरत, अक्षय घरत, दीपक गुरव, सुजित घरत, प्रतिक घरत, प्रवीण भोईर, प्रदीप लाड, संदीप लाड, केतन घरत, मयूर घरत, निकीत घरत, मंदार घरत, मधूर सौरभ लाड, प्रणय घरत, प्राचित लाड, सुबोध म्हात्रे, सागर लाड, हेमंत घरत, रोहीत लाड, साहील लाड, सम्वेद घरत, सोहम घरत, आर्यण घरत, आयुष शिंदे, सूरज गावंड, श्रेयश घरत, शुभम मळेकर, वसंत मळेकर, जितेंद्र घरत, सचिन घरत, रंजीत भगत, ओमकार घरत, श्रीयोग घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version