| मंडणगड | प्रतिनिधी |
मंडणगड शहरात मुख्य चौकानजीक असलेल्या तालुक्याचे धान्य गोदामाच्या इमारतीमुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या उद्भवत आहेत. या असुविधेमुळे गोदामाचे भिंगळोली येथील शासकीय जागेत विस्तापित करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
मंडणगड तालुक्याचे धान्य गोदाम हे नगरपंचायत हद्दीत असून शहराच्या मुख्य चौकात मोक्याच्या ठिकाणी या गोदामाच्या दोन मोठ्या इमारती आहेत. मुख्य चौकात रस्त्यानजीक या इमारती असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या नियमित झाली आहे. इमारतीच्या आजूबाजूस निर्माण अनेक अस्वच्छतेच्या तक्रारी नेहमीच्याच आहेत. शिवाय धान्य गोदाम तहसील कार्यालयापासून लांब आहे, त्यामुळे तहसीलच्या अधिकाऱ्यांना नियंत्रणासाठी गैरसोयीची आहे. शहरातील मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणच्या गोदामाची जागा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग केल्यास या ठिकाणी व्यापारी संकुल, बाजारपेठेसाठी ही जागा महत्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे नगरपंचायत मंडणगड यांना बाजारपेठेसाठी आवश्यक असलेले जागेची समस्या या गोदामाच्या विस्थापानामुळे दूर होऊ शकते. गोदामाचे स्तलांतरण तहसील कार्यालय मंडणगड या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासकीय जागेत करता येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धान्य गोदामामुळे शहरात असुविधा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606