निवारा शेडअभावी प्रवाशांची गैरसोय

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील मुंबई-कर्जत मार्गावरील नेरळ रेल्वे स्थानकातील फलाट एकवरील निवारा शेड तोडण्यात आली आहे. नेरळ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यासाठी नेरळ स्थानकातील प्रवासी निवारा शेड तोडण्यात आली आहे. दरम्यान, शेड तोडण्यात आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.

कर्जत एन्डकडील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेच्या स्थानकात विकासकामे केली जात आहेत. त्यात नेरळ स्थानकात फलाट एकवर असलेल्या निवारा शेडच्या जागी नवीन निवारा शेड बनविण्यात येत आहे. या फलाटावर असलेली प्रवासी निवारा शेड तोडून नवीन उभारली जाणार आहे. सध्या नेरळ स्थानकात फलाट एकवर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या फलाटावर असलेली निवारा शेड तोडण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना उन्हाचा त्रास होत असून, बसण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Exit mobile version