तापाच्या रूग्णात वाढ

। खांब-रोहे । वार्ताहर ।
गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणाचा पारा खाली घसरल्याने थंडीचा कडाकाही वाढू लागल्याने परिणामी सर्दी, खोकला व ताप या आजाराच्या रूग्णात वाढ झालेली दिसून येत आहे. थंडीच्या त्रासामुळे सर्दी, खोकला व ताप रूग्णही वाढू लागल्याने छोट्या मोठ्या दवाखान्यात रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. चार दिवसांपूर्वी कोसळलेल्या अवकळी पावसामुळे वातावरणातील हा गारवा वाढला आहे. तर थंडीच्या दिवसात प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन आपले आरोग्य निकोप कसे राहिल याकडे लक्ष देण्याची सूचना तज्ञ डॉक्टर रूग्णांना देत आहेत.

Exit mobile version