देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ

कोरोनाबळीही पुन्हा हजारापार
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांनी वाढ झाली आहे. बुधवारी 48 हजार 786 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 1005 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1005 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 61 हजार 588 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Exit mobile version