उरणमध्ये रुग्ण संख्येत वाढ

बदलत्या वातावरणाचा परिणाम

| उरण | वार्ताहर |

तालुक्यात डेंग्यू व मलेरिया च्या साथीचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उरणमधील कचरा व साचलेल्या पाण्यामुळे वाढती घाणीची समस्या व वातावरणातील बदल यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उरणच्या आरोग्य विभागाने गावा गावात औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

उरणमध्ये उन्ह पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सखल भागात तसेच अडगळीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासाची उत्पत्ती होत आहे. उन्हाळ्यातही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मलेरियाचे डास वाढत आहेत. त्यात रात्री अपरात्री सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने डासांचा रहिवाशांना त्रास होत आहे. डासांची उत्त्पत्ती होत असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मागणी नागरिकांडून होत आहे.

तालुक्यात डेंगू व मलेरिया यांचे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पावसाळ्यात ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. तरी स्थानिक ग्रामपंचायत तसेच रहिवाशांनी आप आपल्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घ्यावा व साथजन्य आजाराची लक्षणे आढळून आल्यास उपचार करून घ्यावेत आशा सूचना

डॉ.राजेंद्र इटकरे
उरण तालुका आरोग्य अधिकारी
Exit mobile version