मुंबईत कान-नाक-घशाच्या रूग्णसंख्येत वाढ

रोज किमान 30 ते 40 रूग्ण, वेळीच उपचार घेण्याचा सल्ला
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कान-नाक-घशाचे रूग्ण 50 टक्क्यांनी वाढले आहेत. महिन्याला 40 ते 50 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये रोज किमान 30 ते 40 रूग्ण कान-नाक-घशाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. कोरोनाचा परिणाम श्रवणशक्तीवरही होऊ शकतो. त्यामुळे, वेळीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तर, लहान मुलं आणि प्रौढांना याचा अधिक त्रास होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला आहे. याचा थेट परिणाम तुमच्या नाक,कान आणि घशावर होतो. मात्र कोरोनाकाळात अनेकजण डॉक्टरकडे जाणं टाळत होते. किंवा अनेक डॉक्टरही कान, नाक आणि घशाचे रूग्ण तपासत नव्हते. त्यामुळे याचा परिणाम कालांतराने दिसत आहे.कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने डोकं वर गेलं आहे. संपूर्ण जग पुन्हा ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटने स्तब्ध झालं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लक्षणे थोडी वेगळी आहेत. ती जाणून घेणे महत्वाची आहेत. ही लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Exit mobile version