मुरूडमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ

जंजिरा बंद राहणार नाही; पर्यटन क्षेत्रात मात्र धाकधूक
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने मुरूड तालुक्यात थंडीचा गारठा वाढला आहे. मुरुडचा पारा 19अंश सेल्सिअस इतका खाली आला आहे. गुलाबी थंडीचा मोसम असल्याने नाताळ सणाला तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांवर विक्रमी संख्येने पर्यटक हजेरी लावतील, परंतु ओमिओक्रोन विषाणूचे सावट असल्याने मुंबई पुण्यातील पर्यटकातून बुकिंग करताना जाणवत आहे. शासनाने अचानक निर्बंध घातल्यास काय करायचे अशी चिंता अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्याची माहितीयेयेथील हिरा रेसिडेंनसीचे मालक महेंद्र पाटील यांनी दिली.23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत पर्यटनस्थळे आणि जंजिर्‍यात जाण्यासाठी निर्बंध येण्याचे वृत्त पसरले असून या मध्ये काहीच तथ्य नसल्याची माहिती मुरूड तहसीलदार श्री वाकडे, यांनी मंगळवारी दिली. वादळी अवकाळी पावसामुळे हिवाळी महिन्यात थंडी गायब झाली होती. उत्तरेकडील काही राज्यात बर्फवृष्टी होत असल्याने थंडगार वारे महाराष्ट्रात देखील वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र गारठा वाढता आहे. थंडीत पर्यटन आधिक खुलते. गेल्या 15 दिवसांपूर्वी उन्हाचे चटके बसत होते. त्यावेळी मुरूड तालुक्यातील तापमान 31 सेल्सिअस होते. गेल्या 5 दिवसांपासून खाली घसरते असून 20 वर आले आहे. ग्रामीण भागात आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. बाजारातील दुकानात स्वेटर, गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसू लागली आहे.


तहसीलदार श्री वाकडे, म्हणाले की, वरील काळात जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवावा असे कोणतेही निर्देश अद्याप तरी आलेले नाहीत. मात्र लॉजिंग, हॉटेल्समधून संख्या 50 टक्क्यांपेक्षा आधिक नसावी असे निर्देश आहेत. पुरेशी काळजी घ्यावी. मास्क आणि सोशल अंतर राखावे अशा स्पष्टपणे सूचना आहेत. नाताळ सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी प्रचंड प्रमाणात मोठया संख्येने पर्यटक आयत्या वेळी देखील येऊ शकतात, हे लक्षात घ्यावे लागेल.जंजिरा बंद राहणार या वृत्तात सध्या तरी काहीच तथ्य नसल्याचे श्री वाकडे, स्पष्ट केले.

Exit mobile version