शटल सेवेच्या फेर्‍यात वाढ करा


मध्य रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन
। नेरळ । वार्ताहर ।
मुंबईच्या सर्वात जवळ असलेल्या माथेरान पर्यटन येथे कोरोनामुळे पर्यटकांना बंदी घातली होती. त्यामुळे माथेरान मधील आर्थिक व्यवहार थांबले होते. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती आणि त्यामुळे माथेरान मधील पर्यटन सुरू करावे अशी मागणी सातत्याने होत होती. नजीकच्या काळात माथेरानमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामुळे पार्श्‍वभूमीवर मिनी ट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्याची मागणी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनामुळे माथेरानचे पर्यटन बंद असले तरी नेरळ- माथेरान-नेरळ मिनिट्रेनची माथेरान स्टेशन ते अमन लॉज स्टेशन अशी शटल सेवा सुरूच होती. पर्यटकांच्या सेवेकरिता या शटल फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात यावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. विलास पाटील यांच्या उपस्थितीत माथेरान नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी स्टेशन प्रबंधक यांना निवेदन दिले आहे.

यावेळी प्रवीण सकपाळ, किरण चौधरी, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे यांच्यासह नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम, नगरसेविका प्रतिभा घावरे, प्रियांका कदम, सुषमा जाधव, सोनम दाभेकर, रुपाली आखाडे, ज्योती सोनावले आदी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version