गट शिक्षणाधिकार्यांचे आवाहन
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीती जास्त विद्यार्थी पास व्हावे यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली आहे. सध्या शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का घसरला असून अगदी तुरळक विद्यार्थी पात्र ठरत आहेत. या परीक्षेत जास्तीती जास्त विद्यार्थी बसून पात्र ठरणार्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे, यासाठी शिक्षकांनी मेहनत घेऊन आपले विद्यार्थी कसे पात्र ठरतील यासाठी विविध विषयांचा अभ्यासाचे अध्ययन करून उचित यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन मुरुड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाबुलाल पाखरे यांनी केले आहे.
श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूल येथे शिष्यवृत्ती परीक्षेबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर तद्न्य शिक्षक चोरडे शाळेचे राजेंद्र नाईक, हेमंत म्हात्रे, संगीता खानावकर, प्रकाश भोस्तेकर, नांदगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक उत्तमराव वाघमोडे, पर्यवेक्षक श्रीधर ओव्हाळ, प्रवीण भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गट शिक्षण अधिकारी पाखरे यांनी सांगितले कि, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारा विद्यार्थी हा एमपीएसी व युपीएसी मध्ये निश्चित यश प्राप्त करीत असतो. यंदा मेहबूब एज्युकेशन ट्रस्ट विहूर येथील दोन विद्यार्थी पात्र ठरली आहेत. मुरुड तालुक्यातील जास्तीती जास्त विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी शिसख्खंनी चांगली मेहनत घेतल्यास हे सहज शक्य होणार आहे. तद्न्य शिक्षक राजेंद्र नाईक यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यंदाचा निकाल किमान 70 टक्के लागण्यासाठी सर्व शिक्षक खूप मेहनत घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी मुरुड तालुक्यातील विविध शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.