लग्नसराईमध्ये खालूबाजाला वाढती मागणी

| शिहू | वार्ताहर |

कोकणातील ग्रामीण भागातील वाद्यवृंदामध्ये एक पारंपरिक वाद्यकला म्हणजे खालूबाजा. लग्नसमारंभ, मिरवणूक, सण-उत्सव अशा मंगलप्रसंगी खालूबाजा प्रामुख्याने आढळून येतो. अर्थात, वाजविला जातो. एक ढोल, एक टिमकी आणी एक सनई या वाद्याचा संच म्हणजे खालूबाजा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून मंगलसमयी खालूबाजा वाजविला जातो. सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असल्यामुळे बहुतांश ठिकाणी खालूबाजा पाहावयास मिळतो.

सनईच्या सुरावर जुनी पारंपरिक गाणी वाजवली जातात आणि त्याला ढोल-टिमकीची साथ यामुळे पावले आपोआप थिरकायला लागतात. बर्‍याच ठिकाणी बेंजो, ढोलताशे, डीजेची क्रेज असते. मात्र, खालूबाजाची रंगतच न्यारी असते. सध्याच्या आधुनिक युगाला अनुसरून दिवसेंदिवस या वाद्यकलेत वाद्यसंगीतात बदल होत आहे. पण, याचा लोकमागणीवर कोणताही परिणाम नाही. उलट, दिवसेंदिवस खालूबाजाची मागणी वाढत आहे.

Exit mobile version