होमगार्ड मुख्यालयात स्वतंत्र दिन साजरा

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: photo; hw-remosaic: false; touch: (-1.0, -1.0); sceneMode: 8; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 200.36482; aec_lux_index: 0; albedo: ; confidence: ; motionLevel: -1; weatherinfo: null; temperature: 36;

| वेनगाव | प्रतिनिधी |

देशाचा स्वतंत्र दिन सोहळ्याचा कार्यक्रम अलिबाग येथील होमगार्ड मुख्यालय जिल्हा प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि.15) जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी अभिजीत शिवथरे यांनी होमगार्ड बजावत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन होमगार्डसने केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था घाटकोपर येथील मानसेवी निदेशक प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक 1072 मध्ये रायगड जिल्ह्यातील प्रसाद जगन्नाथ नेमन यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील होमगार्ड, अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version