| चौल | प्रतिनिधी |
मराठी माध्यमाच्या शाळांमधून मातृभाषेत घेतलेले ज्ञान चिरकाल टिकते, असे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख विनायक थळकर यांनी केले. चौलमळा येथील प्राथमिक शाळेत भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी शाळांमध्ये मुलांवर चांगले संस्कार बिंबवण्याचे काम होते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवावे, असे आवाहनही थळकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने झाली. त्यानंतर चौलमळा गावचे माजी अध्यक्ष अनंत म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर राज्यगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांना व उपस्थित ग्रामस्थांना चॉकलेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी चौल विभागाचे केंद्रप्रमुख राजेश पाटील, माजी केंद्रप्रमुख विनायक थळकर, चौलमळा गावचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी अध्यक्ष अनंत म्हात्रे, अनंत घरत, किशोर घरत, अनिल नाईक, जयंत नाईक, अनंत नाईक, अजित नाईक, शैलेश नाईक, राजेंद्र नाईक, सुशांत शिवलकर, जितेंद्र नाईक, अमित नाईक, सेवानिवृत्त शिक्षिका विनिता थळकर, रंजना नाखरे, अंगणवाडी सेविका अस्लेषा लोहार, प्रमिला पाटील, शालिनी नाईक, सिद्धी शिवलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेश पाटील यांनी, तर आभार रंजना नाखरे यांनी मानले.
मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
