| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.15) भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच, अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयाठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधािरी भारत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विक्रम पाटील यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयमधील पटांगणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात झाले. जिल्ह्यातील पंचायत समिती, पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालय, वन विभाग, जिल्ह्यातील शाळा, ग्रामपंचायत महाविद्यालयामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. काही ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तसेच वेगवेगळ्या उपक्रमातून भारताचा हा राष्ट्रीय सण जल्लोषात साजरा करण्यात आला.
अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात अमर वार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अलिबाग मधील पोलीस परेड मैदानावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग मधील शासकीय कार्यालयांना आकर्षक सजावट करण्यात आली होती.
नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करताना सरपंच सुप्रिर्या महाडिक तसेच शिवसेनेचे किशोर जैन, राष्ट्रवादीचे भाई टके, विलास चौलकर, डॉ. मिलिंद धात्रक, अखलाक पानसरे, राकेश टेमघरे, संजय काकडे, ज्ञानेश्वर साळुंखे, पुनम काळे, सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन पनवेल महानगरच्या छत्रपती संभाजी महाराज पटांगणात जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सुधागड येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
काराव गडब ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच मानसी पाटील यांच्या हस्ते, जनता हायस्कुलचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका बी.ई. सोनावने यांच्या हस्त, कांळबादेवी युवक मंडळाच्या व्यायाम शाळेचे ध्वजारोहण माजी उपसरपंच दिनेश म्हात्रे यांच्या हस्ते, राजिप प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका रंजना घरत यांच्या हस्ते, संस्कार विद्यालयाचे ध्वजारोहण अनंत चवरकर यांच्या हस्ते, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ध्वजारोहण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
नशायुक्त पदार्थ शरीरास हानिकारक असून त्यांचे सेवन केल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी वडगांव येथील राजिप शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी मोहीम हाती घेऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.
भारत देशाचा स्वातंत्र्य दिन उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, तहसीलदार डॉ. उद्धव कदम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, जेएनपीए बंदराचे अध्यक्ष उन्मेष वाघ, कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, वकील मंडळी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेऊन तिरंगा झेंड्याला सलामी देऊन देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
माजगाव येथील राजिप शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण मुख्याध्यापक किरण आवाज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, यावेळी अल्काईल अमाईन कंपनीच्या माध्यमातून सातवी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त मुरुड तालुका मर्चंट को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेचे ध्वजारोहण संचालक नौशाद दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत सादर करुन भारतमाता की जय, वन्दे मातरम, जय जवान जय किसान, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या.
मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय विकास समिती व प्राचार्य डॉ. जे. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या ठकुबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यमिक शाळेत भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण आणि भांडुप परिमंडल कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे यांच्या हस्ते प्रादेशिक विभाग कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. तर, कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा आणि भांडुप परिमंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता सुनिल यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त माणगाव येथील पोलीस परेड मैदानात तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या हस्ते, नगरपंचायत कार्यालय येथे मुख्याधिकारी संतोष माळी तर विवा कॉलेज येथे सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित चिल्हे येथील श्रमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
नेरळ येथील हुतात्मा चौकात 14 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या स्वातंत्रदिनाच्या पहिल्या प्रहरी 12 वाजून एक मिनिटांनी स्वातंत्रदिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सेनादलातील निवृत्त जवान अर्जुन शिंदे आणि किरण कांबरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, ध्वजारोहण निवृत्त जवान अर्जुन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
नेरळ येथील हुतात्मा चौकातून रात्री अकरा वाजता मशाल फेरी काढण्यात आली होती. विश्वजित नाथ आणि टीमने या मशाल फेरीचे नेतृत्व केले. हुतात्मा चौकातून कल्याण रस्त्याने, धरण ग्रामपंचायत, कुंभार आळी शिवाजी महाराज चौक, हुतात्मा हिराजी पाटील चौकातून पुन्हा हुतात्मा चौक अशी मशाल फेरी काढण्यात आली होती.
खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमच भव्य दिव्य 1 हजार 111 फुट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.
कर्जत येथील के.ई.एस इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान सप्ताह जल्लोषत व उत्साहात साजरा केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष के.के.तातेड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, आनंदा हरुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पो.हवालदार विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रातील सुमारे 85 गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सेजल घुमकर, कृषी विस्तार अधिकारी वसंत दळवी, विस्तार अधिकारी प्रसाद माळी , पोलिस अधिकारी अविनाश पाटील, अस्लम हलडे, नरेश कुबल, मेघा मापगावकर, प्रमोद म्हात्रे, पांडुरंग निरकर, इरफान हलडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतंत्र भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नारायण नागू पाटील संकुलामध्ये को ए.सो चे जेष्ठ संचालक मा. आमदार सुभाष प्रभाकर तथा पंडितशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बारिया प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा डॉ. चित्रा पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांना मानवंदना एनसीसी प्रमुख समाधान भंडारे यांनी दिली. यावेळी शाळा समितीचे सदस्य यशवंत पाटील, स्वप्निल पाटील, धारिणी भगत, सुरेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, लीलाधर धुमाळ, डॉ. श्रीकांत पाटील, अनिल पाटील, विकास पाटील, आर.के. पाटील, किशोर पाटील, शशिकांत पाटील, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सर्व शाखांमधील आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी सरपंच, सदस्य व कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी,पालक वर्ग असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
गोमाशी येथील राजिप शाळेला सुधीर धनावडे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले अशा 10 थोर नेत्यांच्या प्रतिमा भेट दिली. यावेळी सुधीर धनावडेंसह उर्मिला मगर, हर्षादा खैरे, सारिका झोलंगे, सुनीता जंगम, मुख्याध्यापक राजेंद्र खैरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी रमेश गोरे यांनी ध्वजारोहण केले.
रसायनी मोहोपाडा परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त राजिप मोहोपाडा शाळा, वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत, तळाठी सजा कार्यालय आदी परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आदर्श कामगारांचा सन्मान करण्यात आला.