| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या पत्नी स्वाती म्हसे-पाटील (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी तथा वरिष्ठ संचालक (माहिती तंत्रज्ञान (खढ) चिंतामणी मिश्रा, सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सचिन इंगळी, अलिबाग भूमी अभिलेख उपअधीक्षक श्री. जगताप, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, डॉ. सतीश कदम, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य शाखांमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्य परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.