फायनलमध्ये इंग्लंडचा दुसऱ्यांदा धुव्वा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने आयसीसी विश्वचषक जिंकत इतिहास रचला. यासह भारताने अंडर-19 विश्वचषक सहाव्यांदा जिंकण्याचा मान मिळवला. यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 साली भारताने ही ट्रॉफी पटकावली होती.
हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने 412 धावांचे भक्कम आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 40.2 षटकांत 311 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात विश्वचषक जिंकण्याची ही भारताची दुसरी वेळ ठरली. याआधी 2022 मध्ये भारताने इंग्लंडला पराभूत करत किताब जिंकला होता.
